किसान संघर्ष समितीउद्या हुतात्मादिनी करणार आंदोलन

0
54

चोपडा ः प्रतिनिधी
दिल्ली येथे पंजाब,हरियाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी २६ जानेवारीला निघालेल्या ट्रॅक्टर रलीमधे झालेल्या गोंधळाची स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी त्या गोंधळाची जबाबदारी आंदोलक शेतकर्‍यांवर टाकुन त्यांचीच धरपकड व मुस्कटदाबी करणार्‍या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी व तेल,पेट्रोल,गॅस व डिझेल महागाई विरोधात,तसेच स्वामीनाथन समिती शिफारसीनुसार शेत मालास भाव मिळावा म्हणून येत्या ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यनिथीला म्हणजेच हुतात्मादिनी चोपडा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी १० वा तालुक्यातील लालबावटा शेतमजूर युनियन किसान सभा व आयटक कार्यकर्त्यांतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात तालुक्यातील कॉंग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी व समविचारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान संघर्ष समितीतर्फे कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन,राजाराम पाटील,कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष के.डी.चौधरी,सुकाणु समितीतर्फे एस.बी.पाटील,किसान सभेचे अनंत चौधरी,मनोहर चौधरी ,धोंडू पाटील,शेतमजूर संघटनेचे गोरख वानखेडे,शांताराम पाटील, धोंडू पाटील ,वासुदेव कोळी, आम आदमी पक्षातर्फे रईस खान,रजमल पाटील आणि विठ्ठलराव साळुंखे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here