कासोदा पोलिसांतर्फे नाकाबंदी मोहिम राबवत दोषींवर कार्यवाही सुरू..!

0
128

कासोदा ः प्रतिनिधी
येथील स्थानिक पोलिस ठाण्याच्यावतीने राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत दुचाकींवर कारवाई करून दररोज अनपेड ऑनलाईन दंड आकारण्यात येत आहे .
वाढत्या अपघातांची संख्या लक्ष्यात घेता किनगाव येथे झालेल्या आयशर अपघातात १५च्यावर मजुर जागीच ठार झाल्याने जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानव्ये संपूर्ण जिल्ह्यात नाका बंदी मोहीम राबविण्यात येत आहे , वरिष्ठांच्या आदेशानुसार कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव सर व पीएसआय नरेश ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पो.स्टे.च्या हद्दीत दररोज नाका बंदी करण्यात येत असून दोषींवर कार्यवाही करण्यात येत आहे.या मोहिमेत दुचाकी, तीन चाकी,चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत असून चालक परवाना, गाडीचे कागदपत्रे, नंबर प्लेट यासारख्या विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे.
यासाठी कासोदा पो.स्टे.चे पो.हे.कॉ.जगन्नाथ सोनवणे , पो.कॉ. जितेश पाटील,पो.कॉ.अमोल कुमावत,पो.कॉ.प्रविण परदेशी यांच्यातर्फे पारोळा चौफुलीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे तर अचानक झालेल्या या पोलिस कारवाईमुळे वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनचालकांची मोठी त्रैधातिरपीट उडाली.
मोहिमेत सातत्य राहिल ः जाधव
नाकांबदी मोहीम आता नेहमी राबविण्यात येईल. वाहन चालवितांना परवाना आणि सर्व कागदपत्रे सोबत बाळगा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here