ठाणे : वृत्तसंस्था I वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या महाराजाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, आज न्यायालय या कालीचारणबाबाबाबत काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली होती. तसेच विविध ठिकाणी या महाराज विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
रायपूर येथे कालीचारण महाराज याला रायपूर येथे अटक करण्यात आली होती.त्यानंतर ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी काल कालीचरणबाबाला ताब्यात घेतले.
या कालीचरणबाबाला रायपूर येथून नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज या कालीचरणबाबाला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आज न्यायालय कालीचरणबाबा याच्याबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
दरम्यान, मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज याने केले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
