काँग्रेस सेवा फाउंडेशनतर्फे विविध समस्या तक्रारीबाबत यावल तहसीलदारांना निवेदन

0
10

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन तर्फे दि.30रोजी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे मानधन दोन तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे आपण वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून ते मानधन तात्काळ मिळणे कामी कार्यवाही करावी.तालुक्‍यातील अनेक नागरिकांनी लाभ मिळण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसह इतर अनेक योजनेत शासनाकडून लाभ मिळणे कामी अनेकांनी अर्ज दाखल केलेले आहेत.यासाठी समितीची बैठक लवकर घेऊन सदर प्रकरणाचा निपटारा करावा.
ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब आदिवासी,दलित, अल्पसंख्यांक आणि इतर अनेक लाभार्थ्यांना पॉश मशीन थम्ब टेक्नॉलॉजीमुळे धान्य मिळण्यास अडचण येत असून आपल्या स्तरावरून शासन दरबारी बदल करणेकामी कळवावे तालुक्यातील लाभार्थ्यांना डाटा एंट्री मुळे लाभापासून वंचित राहावे लागत आहे तरी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देऊन लाभार्थ्यांना योग्य ती सविस्तर माहिती सांगून त्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्यांना पुन्हा लाभ देणे कामी सूचना कराव्यात.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वारस नोंद करणे कामी प्रकरणे दाखल केलेले असून काही मंडळ विभागात दोन ते तीन वर्ष झाले तरी सुद्धा वारस नोंद होत नाही मंडळ अधिकारी विनाकारण शेतकऱ्यांना फिरवाफिरव करतात तरी आपण आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास दूर करावा आणि संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सूचना कराव्यात इत्यादी मागण्यांचे निवेदन यावल तहसीलदार यांना देण्यात आले.निवेदनावर जळगाव ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष जलील पटेल,अमोल भिरुड,विलास अडकमोल, मीनाक्षी जावरे,नईम शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह अनिल जंजाळे,विकी गजरे,मोहम्मद रफिक,बशीर परमान तडवी, अशपाक शहा,अभय महाजन, सद्दाम शहा धीरज पाटील पुंडलिक बारी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here