जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी शाम तायडे यांची नियुक्ती झाल्या पासून शहरातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशानुसार ते पक्ष घरा घरा पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, शहरातील ‘प्रत्येक घरात, काँग्रेस आपल्या दारात` असा उपक्रम राबवून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते कठीबध्द आहेत त्या अनुषंगाने आज 26जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी शहरातील भाजप चे पदाधिकारी व अ भा सफाई मजदूर संघांचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदजी गोयर, बॉक्स ऑफ हेल्प फौंडेशन च्या संस्थांपिका सुधा काबरा, खेडी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, मीनाक्षी जावळे, प्रकाश चव्हाण (रिंगरोड ), रवींद्र चौधरी (कालिका माता चोक ), सोमनाथ गुळवे (आशाबाबा नगर )राज पाटील, मयूर पाटील, ऍड देविका पाटील (रिंगरोड )सुभाष सोनार,जितेंद्र सावंत (हरिविट्टल नगर )कमलेश राणा (शिवाजी नगर) यांनी पक्षात प्रवेश केला.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित जळगाव जिल्हा (ग्रामीण)चे अध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, डॉ.ए.जी भंगाळे, शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढ, ज्ञानेश्वर कोळी सरचिटणीस (ग्रामीण), दीपक सोनवणे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष सखाराम मोरे, शफी (बागवान, जाकीर बागवान, शिवाजीराव शिंपी, शशिकांत तायडे, राहुल भालेराव, अरुण लोहार, महेंद्सिग पाटील, मुजीब पटेल, नारायण राजपूत, उमेश तायडे, देवा ठाकरे, परवेज पठाण, उद्धव वाणी, शिवराम शिरनामे, रवींद्र भंगाळे, प्रमोद घुगे, आशुतोष पवार, सकीना तडवी, मीराताई सोनवणे,अमिना तडवी,छाया कोरडे, योगिता शुक्ल, अरुणा पाटील, आशा माळी इ पदाधिकारी उपस्थित होते