मुंबई, वृत्तसंस्था । राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्य जागेवर आज कौंग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांनी मुंबई स्थित विधानभवनात विधाभवन सचिव राजेंद्र भागवत यांच्या समोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यांनी यावेळी सांगितले की ,पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला राज्यसभेवर उम्मेदवारी दिली.
त्या बद्दल मी पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी , नेते राहुल गांधी तसेच पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो . त्यांनी दाखवलेल्या विश्वस मी सार्थक करेल . यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे , शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , यांच्या सह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.