जळगाव, प्रतिनिधी । खानदेश सा.प. ला ११ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने काव्य स्पर्धेत कवी गोविंद पाटील यांच्या नशीब या कवितेला रोख पारितोषिक व सन्मान पत्र जाहीर करण्यात आले आहे.
ही स्पर्धा चाळीसगाव शाखेने आयोजित केली होती. गोविंद पाटील यांना निसर्ग काव्याने जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ जीवनावरील पुस्तक बक्षिस मिळाले आहे. ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात नियंत्रण कवी म्हणून काव्य सादरीकरण केले आहे. आर. डी. कोळी, ज्योती देसाई पुणे शिक्षकांकडून व पाथरी गावातील ग्रामस्थ कौतुकाचा वर्षाव करत केला.