चोपडा, प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्नाटकातील बंगळूर येथे घडलेल्या विकृत घटनेचा अ.भा.मराठा महासंघ चोपडा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की,कर्नाटकातील बंगळूर येथे काही समाजकंटकांनी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शाई फेक करुन जाणिव पूर्वक विटंबना केली.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत अशा महापुरुषांचा अपमान त्या ठिकाणी केला गेला.त्यामुळे बंगळूर येथील घटनेमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या.या विकृत घटनेच्या निषेधार्थ चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारकावर दुग्धाभिषेक करुन माल्यार्पण करण्यात आले.तसेच कन्नड समितीच्या जाहिर निषेधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.त्यानंतर चोपडा तहसील व शहर पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.यावेळी चोपडा तहसील येथे श्री.सय्यद यांनी निवेदन स्वीकारले व शहर पोलिस स्टेशन येथे श्री.तांबे यांनी निवेदन स्वीकारले.निवेदणात बंगळूर येथील समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावेत असे मागणी करण्यात आली. यावेळी प्रमोद बोरसे, दिनेश बाविस्कर, प्रदिप पाटील,भटू पाटील,रमाकांत सोनवणे, एकनाथ पाटील,शैलेश वाघ,सतिष बोरसे,राजन पवार, डॉ.सिध्दार्थ साळुंखे, निलेश पाटील,डॉ.रोहन पाटील, हरिश्चंद्र देशमुख, अभिजित देशमुख, अनिल सुर्यवंशी,किरण सोनवणे,दिव्यांक सावंत, मंगेश पाटील,रोहन वाघ,मयुर पाटील,मनिष शिंदे,सौरभ ठाकरे,गोलु पाटील,जयेश पाटील व समाज बांधव,मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.