मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुक्ताईनगर ते बर्हाणपुर रस्त्यावरील कर्की फाट्यावर मध्यप्रदेशातून साडेचार लाख रुपयांचा गुटखा अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आला. दरम्यान गुटख्यासह ओमनी गाडी अशाप्रकारे एकूण साडेपाच लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेत तर्फे करण्यात आली.
यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुलचंद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ठाणे गुन्हे शाखेचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मुक्ताईनगर तालुक्यात मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरून किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ते बर्हाणपूर रस्त्यावरील कर्की फाट्यावर एलसीबीचे पथक दबा धरून बसले आणि त्यावेळेस मध्यप्रदेशातून इच्छापुर कडून मुक्ताईनगरकडे ओमनी कार क्रमांक एम एच १५ सिटी ६५१७ ही कार महाराष्ट्रातील फाट्याजवळ आली असता तिला थांबवून चौकशी केली व तपासणी केली असता त्यामध्ये अवैध रित्या विमल पान मसाला तसेच जीवन तंबाखू या पुड्या आढळून आल्या.
सदर माल कुणाचा आहे असे विचारले असता ओमनी कार चालक पुरुषोत्तम पोलाखरे रा.मुक्ताईनगर व त्याचे सोबतचा इसम राजेंद्र गोसावी रा. मुक्ताईनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे व माल राजेंद्र गोसावी यांचा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या कारमधून ४ लाख ४९ हजार ५०४ रुपयांचा विमाल गुटखा जप्त करण्यात आला असून त्यासोबत एक लाख रुपये किंमतीची ओमनी कार अशाप्रकारे साडेपाच लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान दोघांविरुद्ध मुक्ताईनगरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय निलेश सोळंके हे करीत आहेत. दरम्यान या एलसीबीच्या पथकात सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशरफ निजामुद्दीन शेख, अनिल देशमुख, नितीन बाविस्कर, व चालक अशोक पाटील यांचा समावेश होता.
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्वत्र एलसीबी पथकाचे अभिनंदन होत आहे तर स्थानिक पोलिस प्रशासना संदर्भात नाराजगी व्यक्त केली जात आहे दरम्यान संबंधित आरोपीवर यापूर्वीसुद्धा अवैधरीत्या गुटका वाहतूक करण्यास संदर्भात अनेकदा गुन्हा दाखल असल्याचे समजते.
‘साईमत’ ने उठविला होता आवाज
‘साईमत’ ने यापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरीत्या गुटका विक्री व्यवसायास संबंधित वृत्त दिनांक ७ डिसेंबर २०२० तसेच ९ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे अखेर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे काल साईमत वृत्ताची दखल एलसीबी पथकाद्वारे घेतली गेली असून लाखोंचा माल जप्त करून तसेच एक लाखो रुपयांचे वाहन त्याचप्रमाणे दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ,१४ जानेवारी २०२१ या तारखेला दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास चार साडेचार लाखाचा माल पकडण्यात आलेला होता परंतु मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती. साईमत प्रतिनिधीने पी आय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
अशी कुठल्याच प्रकारचे मुद्देमाल पकडण्यात आलेला नाही. त्या संदर्भात सुद्धा साईमत ने १५ जानेवारी २०२१ रोजी विमल गुटका संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते पोलीस प्रशासनाने शहर व तालुका स्तरावर जागोजागी बीट हवलदारची नेमणूक करूनसुद्धा अवैधरित्याचा गोरख धंदा का खुलेआम चालत असतो, स्थानिक पोलिस प्रशासन यामागे का कानाडोळा करत आहे,यामध्ये देवाण-घेवाणचा ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार तर चालत नाही ना, कारण जळगाव येथून ६० किलोमीटर अंतरावरून एलसीबीचे पथक अवैधरित्या करणार्या अशा प्रकरणाला आळा घालत आह.ेत्यांना दूर अंतरावरून असे मोठी प्रकरणे दिसतात परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाला का दिसत नाही. स्थानिक पोलिस प्रशासन करते तरी काय, असा प्रश्न मुक्ताईनगरच्या सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.