करोना लढा: हायकोर्टाकडून मुंबई महापालिकेचं पुन्हा कौतुक

0
16

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही मुंबईसारख्या महानगरात मात्र दिवसागणिक रुग्णसंख्या कमी होत आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळं संसर्ग कमी झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा महापालिकेच्या या कामाचं कौतुक केलं आहे. ((Bombay High Court Praises BMC For its work against Coronavirus)

राज्यातील करोनाची स्थिती व त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात करण्यात आलेल्या विविध जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं बीएमसीच्या करोनाच्या संदर्भातील कामाचा गौरव केला. ‘मुंबई महापालिकेकडून करोनाविषयक सर्व नियोजन चांगल्या पद्धतीनं होत आहे. मुंबई महापालिकेच्या मॉडेलचे इतर महापालिकांनीही अनुकरण करावं आणि त्याविषयी मुंबई महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन राज्यातील इतर महापालिका आयुक्तांसोबत व्हीसीद्वारे बैठक घ्यावी, असे निर्देश आम्ही १२-१३ मे रोजी दिले होते. त्याचं पालन झालं का? अशी विचारणा हायकोर्टानं यावेळी केली. त्यावर, याविषयी थोड्या वेळात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून माहिती देऊ, असं पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here