मलकापूर : प्रतिनिधी
शहरात कोरोना धरतीवर कडकडीत लॉकडाऊन आहे. असे असले तरी विविध सेवा द्यायच्या माध्यमातून पोलीस व विविध विभागाचे कर्मचारी रस्त्यावर आहेत , त्याचबरोबर दवाखाने व मेडिकल साठी नागरिक देखील रस्त्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात वाटचाल करणार्या सर्वांना मोफत थंडगार रस कृष्णा स्टुडिओ च्या माध्यमातून देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, घटना स्टुडिओ चे संचालक योगेश शर्मा यांनी त्यांच्या शेतातील पाच क्विंटल ऊस उसाचा रस निर्माण करणारी मशीन थंडगार बर्फ त्यास लिंबूची मिश्रण व ग्लास उपलब्ध करून देते थंडगार उसाचा आस्वाद सर्वांना दिला. या उपक्रमात आयोजकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांना आधी विश्वासात घेतले त्यासाठी आयोजकांनी नगराध्यक्ष ऍड. हरीश रावल, पा.पू.सभापती अनिल गाधी, पो.नि. प्रल्हाद काटकर यांच्याशी संपर्क साधून थंडगार रस नागरिकांना पुरविण्यात आला. बुलढाणा रस्त्यावर हा आगळा वेगळा उपक्रम लावण्यात आला. त्यासाठी रामेश्वर गोरले आनंद शर्मा प्रमोद उज्जैनकर मंगेश पाटील विकास राठोड पत्रकार हनुमान जगताप आदीसह अनेकांनी सहकार्य केले.