कजगाव वीज वितरणच्या समस्यांचे निवारण न झाल्याने कार्यालयात शेतकरी मोर्चा

0
13

कजगाव ता.भडगाव – येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील शेत शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या मोटारी (पंप) चालत नसल्याने पीक ऊन धरू लागल्याने संतप्त शेतकरी दि.९ रोजी कजगाव वीज वितरण च्या कार्यालयात धडकले.

तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील तांदुळवाडी फाट्या वरील ट्रान्सफॉर्मर व भोरटेक शिवारातील तारसिंगी ट्रान्सफॉर्मर या दोघ ट्रान्सफॉर्मर वरून गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने या ट्रान्सफॉर्मर वरील विद्युतपम्प चालत नसल्याने गहु, मका,ज्वारी सह फळ बागांना पाणी देता येत नसल्याने पीक ऊन धरत काहि पीक सुकु लागली आहे या बाबतीत या ट्रान्सफॉर्मर वरील शेतकऱ्यांनी अनेक वेळा कमी दाबाच्या विज पुरवठा बाबत विज वितरण कंपनी कडे तोंडी तक्रार केली मात्र सातत्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कमी दाबाच्या विज पुरवठा मुळे काहि शेतकऱ्यांचे विजपंप जळाली काहींचे स्टार्टर जळाली यात एकनाथ रामचंद्र महाले यांचे पंप दोनवेळा जळाले तर नगराज दोधा पाटील यांचा पंप देखील जळाला राजाराम दोधा पाटील यांचे स्टार्टर जळाले याच पद्धतीने काहि शेतकऱ्यांचे पंप व स्टार्टर जळाली आहेत या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पंप च चालत नसल्याने पिकांना पाणी भरता येत नसल्याने पीक ऊन धरू लागली आहे काहि पीक सुकली आहेत पंधरा दिवसा नंतर देखील विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट कजगाव च्या विज वितरण कंप हैनी च्या कार्यालयावर आपला मोर्चा नेला होता मात्र या ठीकाणी अभियंता नसल्याने शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागले अभियंता आजारी असल्याने ते सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here