कजगाव, प्रतिनिधी । एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या झाडांची खुलेआम तोड चालू आहे या वाढत्या वृक्षतोडीमुळे कसे होणार वृक्ष संवर्धन असा प्रश्न उपस्थित होत कजगाव व कजगाव परिसरातून दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली मधून अवैधरित्या लाकडाची तस्करी होताना दिसत आहे याकडे महसूल विभाग तसेच वन विभाग लक्ष देण्याची मागणी होत आहे दरवर्षी हजारो झाडे लावायची व तेवढीच तोडायची त्यामुळे झाडांची संख्या वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे तरी संबंधित विभागाने त्यावर लक्ष देऊन कारवाई करावी जेणेकरून वृक्षतोड थांबेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कजगाव येथे तीन स्वामिल असुन परिसरात वृक्षसंपदा मुबलक प्रमाणात आहे पण गत काही दिवसापासून वन अधिकारी व तलाठी यांच्या दुर्लक्षित पणामुळे अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे कजगाव परिसरात व गिरणा काठावर सध्या लिंबू चिंचवड बाबूळ आंबा यासह उंच डेरेदार हिरवे रुक्ष मोठ्या प्रमाणात होते मात्र विनापरवाना हिरवी जिवंत झाडे तोडण्याचा जणू अवैध वृक्षतोड करणाऱ्यांनी धूम धडाका लावला आहे याकडे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे तर तलाठी याकडे डोळेझाक करीत असल्याने सध्या रस्त्याच्या बाजूला बाबळी व इतर झाडांची कत्तल केली जात आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यास अभय निर्माण झाले आहे कजगाव येथून अवैध वृक्षतोड ची वाहतूक रात्री-अपरात्री जोमात सुरू आहे तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यावरण संतुलनासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी तसेच अवैध वृक्षतोड आणि जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सध्या शेती बाण मोकळा यातून बांधावरील तालुक्यातील शेकडो मोठे डेरेदार वृक्ष तोड झाल्याचे दिसून येत आहे तोड झालेल्या वृक्षांची वन व महसूल विभागाच्या विनापरवानगी वाहतूक होत आहे पहाटे दुपारी सायंकाळी शांततेचा फायदा घेत शहरातून चोरट्या मार्गाने वाहतूक होताना दिसते मात्र दुपारी याच चोरट्या वृक्षतोडीचा वाहतूक मोठ्या प्रमाणात होते ही तोडलेल्या झाडांची लाकडे ट्रॅक्टरने शहरातील स्वामिल वर येतात शहरात काही भागात गिरणा काठालगत लाकडांची मोठी ठीकारी नजरेस पडतात मग ही लाकडे एवढी कुठून आणली जातात यावर वन विभागाचे अंकुश दिसून येत नाही कजगाव सह भडगाव तालुक्यात होणाऱ्या वृक्षतोडीला आळा बसावा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखावा अशी मागणी कजगाव परिसरातून होताना दिसत आहे.
या अगोदर कजगाव परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कार्यवाही केली आहे यापुढे पण 1927 भारतीय वन अधिनियम नुसार अवैध वृक्ष तोड करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल
शितल नगराळे
वनक्षेत्रपाल, चाळीसगाव