औषधी जेवढी महत्त्वाची तेवढेच सकस अन्नसुद्धा शरीरासाठी आवश्यक

0
13

जळगाव ः प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र व रोटरी गोल्डसिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी शहरातील २० क्षयरोगाने पीडित रुग्णांना एक महिन्याचा किराणा तसेच प्रोटीन पावडरचे डबे देऊन मदतीचा हात देण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम पुढील सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मान्यवरांनी केला.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या डी.बी.जैन रूग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी गोल्डसिटी क्लबचे सदस्य डॉ. दीपक अटल यांच्यासह जिल्हा पीपीएम समन्वयक कमेश्वर अमोदेकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा भारंबे, डॉ. शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.
न्यूट्रिशियन सपोर्ट गरजेचा
समन्वयक अमोदेकर यांनी क्षय रुग्णांना न्युट्रिशियन सपोर्ट किती गरजेचा आहे याबाबत रोटरी गोल्डसिटी क्लबच्या सदस्यांना चर्चेदरम्यान कल्पना दिली होती. एमडीआर क्षयरुग्ण घरातील कर्ता पुरूष असल्यास त्याच्या उदरनिर्वाहाचे मार्ग बंद होतात.तसेच सरकारी औषधी जेवढी महत्वाची असते तेवढेच अन्न सुध्दा गरजेचे असते. त्या अनुषंगाने गोल्डसिटी क्लबच्या माध्यमातून २० क्षयरूग्णांना प्रोटीन पावडरचे प्रत्येकी तीन डबे व सहा महिन्यापर्यंत किराणा पुरविण्याचे आश्वासन दिले. क्षयरोग दिनापासून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
केंद्राच्या टिमचे कार्य चांगले

शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना किराणा व पोटीन पावडरचे डबे देण्यात आले. यावेळी डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नेहा भारंबे, डॉ. सायली पवार, डॉ. तिलोत्तमा गाजरे, शहर क्षयरोग केंद्राचे समन्वयक दीपक नांदेडकर,कलेश्वर अमोदेकर, मिलिंद भोळे, प्रशांत मोरे, ज्ञानेश्वर वाणी, विनय महाजन, अजय चौधरी, मुजाहिद खान मन्यार, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
रोटरी गोल्डसिटी क्लबचे सदस्य डॉ. दीपक अटल यांनी या मदती मागील क्लबचा उद्देश सांगताना रुग्ण सुधारण्यासाठी याचा उपयोग कसा होतो हे प्राथमिक स्तरावर सहा महिन्यापर्यंत राबवण्यात येईल. त्यानंतर दोन वर्षासाठी पुढे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. शहर क्षयरोग केंद्राची टिम चांगले कार्य करीत असताना त्यांच्या कार्याला गोल्डसिटी क्लबचा अल्पसा हातभार लागल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here