जळगाव ः प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण बचावसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यामार्फत मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोर्चात सहभागी होणार्या प्रत्येक व्यक्तीने माक्स, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करण्याची खबरदारीही घेतली. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावेत आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात जिल्हाभरातून महिलांनीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सरिता माळी(कोल्हे)यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात निरीक्षक शालिग्राम मालकर, जिल्हाध्यक्ष सतिश महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाजन, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली महाजन,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, लेवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, समता परिषद युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,बारा बलुतेदार संघ प्रतिनिधी चंद्रशेखर कापडे, समाजाचे प्रतिनिधी शिवाजी शिंपी, नाभिक समाजाचे प्रतिनिधी बंटी नेरपगार, शोभाताई चौधरी, निवेदिता ताठे, सुषमा चौधरी, विजय महाजन, आकाश कुंभार, सदाशिव भोई, चेतन निंबाळकर, ज्ञानेश्वर महाजन, रामुजी सैनी,संतोष इंगळे,नंदु पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज बांधवांनी सहभाग घेतला.