ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कला आणि विज्ञानाचा अनोखा संगम

0
8
चोपडा प्रतिनिधी संदीप ओली
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा विजय पाटील, प्रमुख अतिथी डॉ. प्राजक्ता भामरे, प्राचार्य राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, एन. एस. सोनवणे, प्रा. डी. एस. पाटील, डॉ. ए. एल. चौधरी, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा परीक्षक डॉ. एस.आर. पाटील, डॉ. लालचंद पटले, डॉ. हनुमंत सदाफुले  तसेच चित्रकला परीक्षक प्रा. सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, पालक प्रतिनिधी दीपक सोमाणी, धनराज पाटील, संदेश क्षीरसागर, दिपक भानुदास पाटील, ऑक्सफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका ममता न्याती, उपमुख्याध्यापिका परमेश्वरी राजकुमार यांची उपस्थिती होती.
प्रारंभी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर करून गणेश वंदना सादर केली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी सुरेल स्वरात स्वागतगीत व सातवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले. या  कार्यक्रमाच्या दरम्यान विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांमध्ये  सांताक्लॉज कॅप डेकोरेशन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विज्ञान प्रकल्प स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र  यांसारख्या विविध शास्त्रांतील  ज्ञानावर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपयोजित विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचा समावेश देखील या विज्ञान प्रदर्शनात होता. विविध आकर्षक व माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमाने दैनंदिन समस्यांवर उपाय या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुचविले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मरणचित्र, स्थिरचित्र, कोलाज काम, द्विमिती संकल्पचित्र (पेन अँड ईंक), पेन्सिल शेडिंग, रेखाचित्र यांसारख्या विविध चित्र प्रकारांचा समावेश या चित्रप्रदर्शनात होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ममता न्याती यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक संदीप पाटील आणि कल्पना बारी यांनी केले. आभार प्रदर्शन दिप्ती पाटील यांनी केले. नॄत्याच्या सादरीकरणासाठी शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनासाठी विज्ञान शिक्षक कल्पना बारी, रुपेश चव्हाण, किरण बडगुजर, पूजा मगरे, अर्चना जैन, कृपाली पाटील यांचे  मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here