एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

0
87
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

एरंडोल, प्रतिनिधी । कासोदा येथे सद्गुरु गोविंद महाराज यांच्या व श्री संत मावजी महाराज यांच्या आशीर्वादाने कासोदा येथील महादेव मंदिरात परंपरागत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होत आहे त्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.

भाद्रपद शुद्ध अष्टमी ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दिनांक १४ सप्टेंबर २१ ते २० सप्टेंबर २० पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिनांक १४ सप्टेंबर मंगळवारी भागवताचार्य श्री ह भ प तुकाराम मुंढे महाराज (परळी वैजनाथ) दि १५ सप्टेंबर बुधवार रोजी किर्तन केसरी श्री प ह भ प अक्रूर महाराज (गेवराई) दि. १६ सप्टेंबर गुरुवार रोजी किर्तन कोविंद श्री ह भ प उमेश महाराज दशरथे (परभणी) दि.१७ सप्टेंबर शुक्रवार रोजी संगीत गंधर्व श्री ह भ प पुरुषोत्तम महाराज (बुलढाणा) दि.१८ सप्टेंबर शनिवार विनोद सम्राट श्री ह भ प नितिन दास महाराज ( मलकापूर ) तर दि.२०सप्टेंबर सोमवार रोजी समाजप्रबोधनकार श्री ह भ प विश्र्नाथ महाराज( वाडेकर) यांच्या किल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या सोबत दररोज सकाळी पाच ते सहा काकड आरती,सांयकाळी सहा ते सात हरिपाठ,सात ते आठ हनुमान चालीसा,व रात्री नऊ ते अकरा हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.दि २० सोमवारी सकाळी सहा वाजता काकडा आरती,त्यानंतर आठ ते दहा काल्याचे किर्तन व ११ पासून महाप्रसादाचे आयोजन केले असून, सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे.सदर कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन हरिनाम सप्ताह पंचमंडळ,ग्रामपंचायत कासोदा, भजनी मंडळी व ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here