एकल माता पालकांचा सत्कार

0
4

 

एकल माता पालकांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) –

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाच्या वतीने एकल माता पालकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे (संचालिका, के.सी.ई. सोसायटी ), पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष निरंजन वाणी, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते.

सौ. रत्नमाला शिंदे यांनी मानपत्राचे वाचन व कविता सादर करून स्त्रीशक्तीचा जागर घडवला, सौ. मनिषा जयकर यांनी ‘आई’चे महत्त्व दर्शवणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली.

यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी आयुष्यात येणाऱ्या संकटांवर सकारात्मक विचारसरणीने मात करा. मुलांना आदर्श नागरिक बनवा. गृहिणी नव्हे तर गृहनिर्माते बना. स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्या आणि समाजात स्वतंत्र स्थान निर्माण करा, असा संदेश दिला

सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले, आभार मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. ए. पाटील, निर्मल चतुर, रफिक तडवी, सौ. मनिषा जयकर, सौ. रत्नमाला शिंदे, सौ. मंगल गोठवाल, अनिल शिवदे, चंदन खरे, शुभम तायडे, तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here