Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»एएसपी असल्याची बतावणी करत सांगवीत शिक्षिकेवर बलात्कार
    राज्य

    एएसपी असल्याची बतावणी करत सांगवीत शिक्षिकेवर बलात्कार

    saimat teamBy saimat teamSeptember 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सांगवी : वृत्तसंस्था । व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने एका 38 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवेन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच “मी निवृत्त एसीपी आहे, माझं कोणी काही करू शकत नाही.ही बाब कोणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

    विकास अवस्ती असे आरोपीचे नाव असून त्याने तो एसीपी असल्याची बतावणी केली.प्रत्यक्षात मात्र तो एसीपी नसल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अवस्ती अद्याप मोकाट असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी 38 वर्षीय शिक्षिकेने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शिक्षिका असून त्यांना पैशांंची अडचण असल्याने त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली.आरोपीने दरमहा दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे देतो असे सांगत पीडित महिलेला घरी बोलावले. दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर सह्या घेतल्या. पीडितेला सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिले आणि पीडितेवर बलात्कार केला.

    त्यानंतर पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून महिलेला पैसे न देता पाठवून दिले. या घटनेमुळे पीडित शिक्षिका घाबरली होती.पीडित महिला कार्यरत असलेल्या शाळेत आरोपी अवस्ती गेला तिथे पीडितेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवले व शाळेत आणि घरच्या व्यक्तींना फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.

    दरम्यान, आरोपीने पीडितेला दुचाकीवर बसवून घरी नेले. बदनामी होईल या भीतीने पीडित शिक्षिका दुचाकीवर बसली. तिला आरोपी घरी घेऊन गेला,तिथे पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला. आरडाओरडा केलास तर मारून टाकेन, अशी धमकी अवस्तीने दिली. “तू जर हे घरी सांगितलंस तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. मी निवृत्त एसीपी आहे, कोणीही माझे काही करू शकत नाही”, असे देखील आरोपी म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरण जास्त गंभीर होत असल्याचे आणि अवस्ती देत असलेला त्रास पाहून महिलेने पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.