जळगाव : प्रतिनिधी
उपमहापौर आपल्या दारी अभियानामूळे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामांत सुधारणा घडून आल्या असून, रस्ते परिसर झाडून स्वच्छ होत आहेत. रस्त्यांवरील खडडे मुरूमाने बुजली जात आहेत. प्रभाग क्रं. ७ च्या विविध भागांचा उपमहापौर सुनिल खडके यांनी धावता दौरा केला.
अजय कॉलनी, निशांत बिल्डींग परिसर, संगम सोसायटी, हर्ष रेसिडेन्सी गल्ली, मित्र नगर, गुरुदत्त कॉलनी, गणेश कॉलनी- शिव कॉलनीचे काही भाग यांना भेटी देऊन तेथील स्वच्छता आदी नागरी सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. दौर्यात स्थायी समितीच्या माजी सभापती ड शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना भरत सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, अतिक्रमण सभापती किशोर बाविस्कर नगरसेविका दिपमाला काळे, मिनाक्षी गोकुळ पाटील, आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थीत होते.
उपमहापौर आपल्यादारी अभियानामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता, पाणी पुरवठा, सार्वजनिक सेवा, अतिक्रमण निर्मुलन आदी विभागाच्या कामांत सुधारणा झाल्या आहेत. उपमहापौर आणि महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक वरिष्ठ अधिकार्यांसह दररोज निरनिराळया भागांना प्रत्यक्ष भेटी देत असल्याने कर्मचार्यांवर वचक निर्माण झाला आहे. रस्त्यांवर असलेले खड्डे बुजले जात असुन परिसर झाडुन स्वच्छ होऊ लागले आहेत. गटारी नियमित उपसल्या जाऊ लागल्या आहेत. तास दोन तास थांबुन गायब होणार्या कर्मचार्यांकडे लक्ष ठवले जात आहे. ज्या ज्या भागात उपमहापौरांनी दौरे केले तेथील नागरीक याबाबत समाधान व्यक्त करतांना दिसुन आले.
उपमहापौरांनी या आधी शिवाजी नगर, कानळदा रोड या भागांचा दौरा केल्यानंतर त्याभागातील रस्त्यांवरील खड्यांची समस्या समोर आली होती हे खड्डे मुरमाने बजवुन रोड रोलरने सपाट केली जात आहेत. शंकर आप्पा नगर जुना असोदा रोड आदी भागात अनेक ठिकाणी रस्ते आणि मोकळया जागांत सांडपाण्याची डबकी साचून पुरुषभर उंचीचे पाणगवत उगवलेले होते. उपमहापौर दौर्यानंतर हा गाळ आणि पाणी उपसण्यात आले असुन सांडपाणी वाहुन नेण्यासाठी विस्तारीत भागात चार्या करण्यात येत आहेत.
ट्रॅफीक गार्डनची समस्या मार्गी लागली
ट्रॅफीक गार्डनमध्ये कचरा टाकुन तो इतरत्र पसरत असल्याची बाब मंगळवारच्या दौर्यात उपमहापौरांना आढळली होती. त्यानंतर या मैदानाच्या उत्तर दिशेस अधिकार्यांनी तातडीने कचर्याकरीता खंदक तयार करुन आवश्यक उपाय योजले आहेत.
नाल्याचे पाणी प्लॉटमध्ये
संगम सोसायटी भागात नाल्याला उर्वरित भागात कठडे बांधण्यात आलेले नसल्याने नाल्याचे पाणी खाजगी प्लॉटमध्ये शिरत असल्याची तक्रार रहीवाश्यांनी केली. यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत आहे. नाल्याला कठडे बांधण्यासंबधी कार्यवाही करण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.
यांच परिसरात नळाचे पाणी रात्री तीन ते सकाळी सहा पर्यंत तीन तास येते. त्यामुळे नागरीकांची झोपमोड होते. आणि पाणी रस्त्यांवर वाया जात राहते. पाण्याचा हा कालावधी तीन तासावरुन दीड तासावर आणावा व पाणी तीन ऐवजी चार वाजेनंतर सोडावे, अशी मागणी रहीवाशांनी केली.
अजय कॉलनी, हर्ष रेसीडेन्सी या भागात गटारी आणि रस्ते साफ होत नसल्याबद्दल रहीवाश्यांनी नाराजी व्यक्त केली. काही गल्ल्या अमृत योजनेतुन सुटलेल्या असल्याने त्या अमृत योजनेत समाविष्ठ करण्याची मागणी करण्यात आली. उपमहापौरांनी त्याबाबत अभियंत्यांना सुचना दिल्या आहेत. झेड .पी कॉलनी, हायवे लगतची गल्ली यातील काही भागात नविन गटारी झालेल्या नाहीत. त्यामुळे रहीवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. गटरीचे एस्टीमेट्स तयार करण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.
गुरुदत्त कॉलनी, सिध्दी विनायक मंदीर परिसर येथेही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.तसेच रस्त्यावरील झाडे उंच वाढल्याने त्यांच्या फांद्या वीज तारांना धडकुन वारंवार वीज जाणेचे प्रकार घडतात. फांद्या छाटण्याची मागणी नागरीकांनी केली. अनेक भागात कच्या चार्यांमुळे सांडपाण्याचा निचरा निट होत नसल्याने, रस्त्यावर चिखल व घाण निर्माण होत आहे. या भागात पक्क्या गटारी उभारण्याची मागणी करण्यात आली आवश्यक कार्यवाहीचे निर्देश उपमहापौरांनी अधिकार्यांना दिले आहेत. गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येऊन तुंबण्याचे प्रकाराकडे या दौर्यावेळी लक्ष वेधण्यात आले.
शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी व्ही ओ सोनवणी, प्रकल्प विभागाचे अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, अभियंता, संजय नेवे, योगेश वाणी, अतुल पाटील, अविनाश कोल्हे, मंजुर खान, मोरे, रचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, सुहास चौधरी, अतिक्रमण अधिक्षक इस्माईल शेख, आरोग्य अधिक्षक एस व्ही अत्तर्दे, निरिक्षक रमेश कांबळे, आदी अधिकारी यांची यावेळी उपस्थित होते.