जळगाव ः प्रतिनिधी
परिवर्तन उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करून सांस्कृतिक क्षेत्रात जळगावचा नावलौकिक वाढवत आहे. भाऊंच्या उद्यानातील अॅम्पी थिएटरचा उद्देश परिवर्तनने पूर्ण केला असल्याचे मत भावांजली महोत्सवाच्या समारोपात जैन उद्योग समूहाचे संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा समारोप रविवारी संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्या ‘हंस अकेला’ने झाला.त्यात दर्शना पवार लिखित ‘बहिणाबाई’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.दीपक बारी यांनी भंवरलाल भाऊंवर लिहिलेली इंग्रजी कवितेची फ्रेम अतुल जैन यांना भेट देण्यात आली. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, डॉ. अमोल सेठ, यजुर्वेद महाजन, रंगकर्मी जगदीश नेवे उपस्थित होते. ‘माटी कहे कुम्हार सेफ ’, ‘कर गुजराण फकिरीमे’ , ..उड जायेगा हंस अकेला..,ला रसिकांची दाद मिळाली.पद्मश्री भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू असलेला भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा रविवारी ..हंस अकेला.. या संगीतमय कार्यक्रमाने भावांजलीचा समारोप करण्यात आला. या संगीतमय कार्यक्रमातून कबिरांचा शोध घेण्यात आला. सुदीप्ता सरकार, श्रद्धा कुलकर्णी, अनुषा महाजन, अक्षय गजभिये यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. घुंगट के पट खोल, कहा से आया कहा जावोगे, की चू दीन मोने मोने, पांडुरंग कांती, विश्वाचे आर्त, चदरीया झिनी रे झीनी,हमारे राम रहीम, माटी कहे कुम्हारसे, कर गुजराण फकिरीम, उड जायेगा हंस अकेला, कोई नहीं अपना हे दोहे परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केले. कार्यक्रमात शंभू पाटील यांनी कबिरांचा प्रवास उलगडून दाखवला. यात गायिका सुदीप्ता सरकार, श्रद्धा कुलकर्णी, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, विशाल कुलकर्णी, अनुषा महाजन, प्रतिक्षा कल्पराज, विनोद पाटील, हर्षदा कोल्हटकर, साक्षी पाटील, अक्षय गजभिये,तबल्यावर मनीष गुरव, बासरी वादक योगेश पाटील यांनी कार्यक्रमात रंगत आणली.तन्वी मलारा यांनी सूत्रसंचालन केले.