जळगाव ः प्रतिनिधी
जागतिक शांतीसाठी एक पाऊल या संकल्पने अंतर्गत ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागाच्या जळगाव शाखेतर्फे जागतिक शांती आणि समृद्धीसाठी रविवार दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ८.१५ वाजता शांतीयात्रेचे आयोजन केले आहे.
ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे ंसन २०२१ हे वर्ष विश्व शांतीसाठी युवक अर्थात् यूथ फॉर ग्लोबल पीस म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिवसापासून या उपक्रमाची सुरुवात झालेली असून १२ ऑगस्ट अर्थात आंतर राष्ट्रीय युवक दिवसापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.त्याअनुषंगाने प्रथम कार्यक्रम …जागतिक शांतीसाठी एक पाऊल… हा असून जळगाव ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी स्थित सेवाकेंद्रातर्फे रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.१५ वाजता शांतीयात्रा आयोजित केली आहे.
कोव्हीडची परिस्थिती लक्षात घेता, शारीरीक अंतर आणि सर्व शासकीय नियमांचे पालन करुन सदरहू शांतीयात्रा निघणार आहे. ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी पासून सुरुवात होऊन, छत्रपती शाहु महाराज रुग्णालय, रिंगरोड कडे वळून पुढे पु.न. गाडगीळ चौका पासून बहिणाबाई चौधरी उद्यानाला वळसा घालून महेश प्रगती हॉल आणि पुन्हा रिंगरोड चौफुली वरुन ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी सेवाकेंद्रात विसर्जन होईल.
जागतिक शांततेचा संदेश देणार्या या यात्रेत निवडक ५० युवक वर्ग सहभागी होणार असून इतर सर्वांसाठी याचे थेट प्रसारण हीींिीं://ुुुर्र्.ूेीीींलश.लेा/ल/इज्ञगरश्रसरेपर्डीलूेपश या युट्यूब चैनलवर सुद्धा उपलब्ध असेल.