उत्तर प्रदेशात 58 जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु

0
10

लखनऊ, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले असून मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे वृत्त आहे.राज्याच्या पश्चिम भागाच्या 11 जिल्ह्यांतील 58 मतदारसंंघात मतदान होत असून या 58 मतदारसंघातील प्रचार मंगळवारी थंंडावला होता.

मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या 58 मतदारसंघात एकूण 623 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी 27 लाख मतदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या 58 मतदारसंघांपैकी 53 जागा भाजपने जिंकल्या होत्या तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या, तर एका जागेवर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता.त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

भाजप उमेदवाराच्या समर्थकांवर हल्ला
नॉयडा : बागपत जिल्ह्यातील छपरौली भागात निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार साहेंद्र रामला यांच्या समर्थकांवर कथितरीत्या हल्ला करण्यात आला, तसेच त्यांच्यावर शेण फेकण्यात आले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे, असे बागपतचे पोलीस अधीक्षक नीरज सिंह जुदाऊँ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here