Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»ईच्छादेवी चौकात पादचार्‍याला चिरडले
    जळगाव

    ईच्छादेवी चौकात पादचार्‍याला चिरडले

    saimat teamBy saimat teamApril 3, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    पहाटे शतपावलीसाठी निघालेल्या ४३ वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ईच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात काळे नगरात वास्तव्यास असलेले सतिश शंकर परदेशी (वय ४३) हे वकिलीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मागील काही दिवसांपासून त्यांचे काका हे आजारी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी रात्रभर ते जिल्हा रुग्णालयातच मुक्कामाला होते. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते शतपावलीसाठी सिंधी कॉलनीच्या मार्गाने शतपावली करत राष्ट्रीय महामार्गावरील ईच्छादेवी चौकातून अजिंठा चौफुलीकडे जात होते. यादरम्यान महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात त्यांच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने त्यांच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्थानकाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या खिशातील आधारकार्डाच्या आधारे त्यांची ओळख पटली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता तर एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील व पोहेकॉ मुदस्सर काझी हे करीत आहेत. मयत ऍड. सतिश संजय परदेशी यांच्या पश्‍चात आई गंगाबाई, पत्नी संगिता, मुलगा वंश व दोन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.