जळगाव प्रतिनिधी (इकरा नगर)- येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन कॉलेज चे चेअरमन मा. अब्दुल रऊफ शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इरफान शेख, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या फूड फेस्टिवल ला इकरा नगर येथील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, इकरा डी.एड. कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेट दिली व विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या फूड फेस्टिवल मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रगडा, पाणीपुरी, शाही तुकडा, भेळ, लस्सी, बासुंदी, गुलाबजाम आणि इतर खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते.
या फेस्टिवलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रा. फरीदा लहरी व प्रा. निलोफर शेख यांनी मार्गदर्शन केले. वरील दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.