Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»इकरा थीम महाविद्यालयात विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळेचे आयोजन
    जळगाव

    इकरा थीम महाविद्यालयात विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळेचे आयोजन

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2022Updated:February 18, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विद्यार्थी हा केंद्र बिंदू – प्रो .कुलगुरू डॉ .बी .व्ही .पवार यांचे प्रतीपादन
    जळगाव प्रतिनिधी : इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच. जे. थीम महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 फेब्रुवारी, 2022 गुरुवार रोजी एच. जे. थीम महाविद्यालय, मेहरूण येथे एक दिवसीय ‘ प्राचार्य/ संचालक व विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळा ’ आयोजित करण्यात आली. कार्यक्रमा ची सुरवात कुराण पठणाने डॉ.अख्तर शाह यांनी केली. महाविद्यालयातील विद्यार्थीनिनी रीफत फातेमा याने इकरा संस्थे चे तराना- ए- इकरा गीत गाईले.
    प्रस्तावना महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य आय.एम.पिंजारी यांनी केली. कार्यक्रमाचे उद् घाटन प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रो. डॉ बी. व्ही. पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमात, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इकबाल शाह, सचिव एजाज मलिक , अब्दुल रशीद शेख, अमीन बद्लीवाला, मजीद सेठ झकेरिया, प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, डॉ.राजेंद्र फालक, डॉ.राजेंद्र वाघुळदे, डॉ. आय. डी.पाटील, जिल्हा समन्वयक पवन चुडामण पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क .ब.चौ .उमवि चे प्रो कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार ,यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून आपले विद्यापीठ कार्य करीत आहे. विद्यार्थ्यान मध्ये संभाषण कौशल्य .इम्प्लोयेबिलीटी इन्डेक्स ,ईत्यादि कौशल्य विकसित करणे गरजे चे आहे.
    विद्यार्थी विकास समन्वयक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, विध्यार्थी विकास अधिकारी यांच्या वर खूप मोठी जबाबदारी आहे व त्यांनी विद्यापीठा मार्फत मिळत असलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोग करावा, असे आवाहन केले. एजाज मलिक यांनी आपल्या सम्भोधनात सांगितले कि शिक्षकांचे महत्व समाजात खूप महत्वाचे आहे हे पटवून दिले. डॉ.इकबाल शाह यांनी विद्यार्थी विकास विभागा च्या वेगवेगळ्या योजनांचे विद्यार्थ्यांना लाभ होईल,या साठी प्रयत्न झाले पाहिजे असे सांगितले.
    अध्यक्षीय भाषणात डॉ.अब्दुल करीम सालार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विध्यार्थ्यांना रोजगाराभिमुख करणे हि देश सेवा आहे.आणि देश सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची मोहीम आमच्या महाविद्यालयातून या कार्यशाळे द्वारे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

    व्दितीय सत्रात ‘व्यक्तिमत्त्व विकासात विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचे योगदान’ या विषयावर माजी प्राचार्य डॉ. विवेक काटदरे यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुनील कुलकर्णी यांनी विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत वार्षिक कार्यक्रम नियोजन आणि इतर महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जळगाव जिल्हया अंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी विकास अधिकारी, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी व महिला अधिकारी, यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमा चे सूत्रसंचालन प्रा.मुजम्मील काजी यांनी केले.कार्यक्रामाच्या शेवटी उपस्थितांचे आभार महाविद्यालया चे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.राजेश भामरे यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्विते साठी , प्रभारी प्राचार्य आय.एम. पिंजारी, प्रा. रेखा देवकर., डॉ. अंजली कुलकर्णी ,डॉ.आयेशा बासीत, डॉ.राजेश भामरे , डॉ.चांद्खान ,डॉ.फिरदौस शेख ,डॉ.युसुफ पटेल,डॉ.शकील फिरदौसी,डॉ.वकार शेख,प्रा.साजिद मालक, डॉ.शेख इरफान,डॉ.शबाना खाटिक,डॉ.दापके,डॉ.हाफिज शेख,डॉ.राजू गवरे,डॉ.अख्तर शाह ,डॉ.तन्वीर खान,डॉ.मुस्तकीम,डॉ.काहेकशा अंजुम, डॉ.अमीन काजी, डॉ.उमर पठाण यांनी तसेच रफिक शेख,कमिल शेख, हमीद पटेल, असिफ शेख ,यांनी परिश्रम घेघेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.