इकडे आलात तर झोडून काढू, माजी कृषिमंत्र्यांचा इशारा

0
43

मुंबई, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. यामुळे बिथरलेल्या काँग्रेसने राज्यात आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात सगळ्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेसच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील नरिमन पॉईंट, दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर अमरावतीमध्ये भाजप आमदार आणि माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here