आ. शिरीष चौधरींच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन

0
22

 

यावल प्रतिनिधी 

आ.शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून यावल ग्रामीण रुग्णालयास अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली असून शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी कोरोना संसर्गाच्या अतिश्य दुदैवी व संकटमय काळातील घटनांवर प्रकाश टाकून रुग्णालयास ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज असल्याचे सांगितले असता येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिक आमदार विकास निधीतून आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णांच्या सेवेसाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक ही अत्याधुनिक यंत्रणा असलेली रुग्णवाहिका अर्पण केली. या रुग्णवाहीका लोकापर्ण सोहळ्याच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कदीर खान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. बी. बारेला आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळ्यात काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे ,नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, काँग्रेस आदीवासी सेलचे यावल तालुका अध्यक्ष बशीर तडवी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, युवा कार्यकर्ते धनंजय शिरीष चौधरी, मारुळ चे सरपंच जावेद जनाब समाधान पाटील उमेश जावळे, इमररान पहेलवान, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला इंगळे, हाजी गफ्फार शहा,जलील पटेल, ,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे, युवक कॉग्रेसचे नईम शेख, यावल नगर परिषदचे गटनेते सैय्यद यनुस सैय्यद युसुफ, सक्लेन शेख, रहेमान खाटीक, अ.जा. जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सैय्यद असद अली , काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, खरेदी विक्रीसंघाचे माजी संचालक सतीश पाटील, समाधान पाटील,, राजू करांडेसह अनेक कार्यकर्ते पदधिकारी या लोकापर्ण सोहळयास उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here