Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»आशिया कप ः  भारत-पाकिस्तान लढत पावसामुळे सामना रद्द झाल्यास एक दिवस राखीव
    क्रीडा

    आशिया कप ः  भारत-पाकिस्तान लढत पावसामुळे सामना रद्द झाल्यास एक दिवस राखीव

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोलंबो : वृत्तसंस्था

    आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा आज १० सप्टेंबरला होणार आहे पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं काय असेल, हे आता समोर आले आहे.
    भारत आणि पाकिस्तान आता आशिया कपच्या सुपर ४ फेरीत दाखल झाले आहे.या फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना झाला आहे.पाकिस्तानचा पहिला सामना बांगलादेशबरोबर झाला होता.या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर विजय साकारला होता. दुसरीकडे भारताचा सुपर फेरीत पाकिस्तानबरोबर पहिला सामना असणार आहे.त्यानंतर भारताचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तान यांंच्याबरोबर दोन हात करणार आहे.त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर सुपर ४ च्या गुणतालिकेत मोठा बदल होऊ शकतो.
    भारत आणि पाकिस्तानचा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना पुन्हा समान गुण दिले जातील. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाना समान १ गुण दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ हा २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जर पाकिस्तानला १ गुण मिळाला तर ते पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होणार आहेत. दुसरीकडे भारताला एक गुण मिळेल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी ९ सप्टेंबरला श्रीलंका व बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्यांना दोन गुण मिळतील आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. त्यामुळे भारतीय संघ एका गुणासह तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. त्यामुळे जर १० सप्टेंबरला होणारा सामना रद्द झाला तर भारतापेक्षा त्याचा फायदा पाकिस्तानाच जास्त होणार आहे.
    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ मधील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण जरी दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही तर भारत आणि पाकिस्तान यांना समान एक गुण दिला जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.