मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
तालुक्यातील आशा वर्करांना तोंड दाबून बुक्क्याचा मार, याप्रमाणे महिलांची डिलिव्हरी झाल्यास कुठलेही दवाखान्यात दाखवा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल, अशी धमकी खुलेआम अधिकार्यांकडून देण्यात येत असून आशा वर्करांनी काय करावे, असा प्रश्न आशा वर्करांमध्ये उपस्थित होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चार पीएससी असून त्यामध्ये दोनशे ते अडीचशे आशा वर्कर काम करत आहेत. त्यांना कुठल्याच प्रकारचा पगार मिळत नसून ते मानधनावर काम करत आहेत. मानधन सुद्धा नसल्यासारखे त्यांना मिळत असून ते आपले काम परिपूर्ण बजावत असून त्यांना वरिष्ठ अधिकार्यांकडून धमकावले जात आहे. मुक्ताईनगर जुने गाव ठिकाणी असलेले जुने बसस्थानकात तालुका उपकेंद्र दवाखाना असून ज्यामध्ये साधे दवाखान्यामध्ये लागणारे कुठलेही उपकरण नसून त्यामध्ये पंखा सुद्धा नाही. आहे त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचे कंपाउंडर किंवा नर्स उपलब्ध नसतात. त्यामुळे बहुतांश मुक्ताईनगर येथील जुने गाव ठिकाण येथील महिला घरीच डिलीव्हरी होत असून त्यांची डिलिव्हरी जवळच असलेल्या मध्यप्रदेशातील कुठल्याही रुग्णालयात दाखवण्यात येते. कागदपत्रावर ती फक्त एमपी म्हणजे मध्यप्रदेश लिहिले जाते. परंतु कुठल्या हॉस्पिटलला डिलिव्हरी झाले याचे निदान लागत नाही, असे का केले जाते, यामध्ये असे का घडते, अधिकारीवर्ग स्थानिक उपकेंद्राला विचारणा का करत नाही, डिलिव्हरी घरी झाल्यास अधिकारी वर्गाला मोठा प्रश्न पडतो. परंतु एमपीमध्ये दाखवून कुठल्या रुग्णालयात डिलिव्हरी झाली, याची विचारणा का करत नाही, की नुसते डॉक्युमेंटच्या आधारे कामे केली जातात.
आशा वर्कर पूर्ण मेहनतीने दिलेल्या प्रभागाचे काम हाताळत असून ते पूर्ण दिलेल्या भागांमध्ये पूर्ण वेळ देत असून आपली जबाबदारी पाळत आहे. आशा वर्कर यांना नागरिकांना समक्ष संवाद साधावा लागतो. त्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला आजाराविषयी विचारपूस करून तपासणी करावी लागते. कोरोना काळात सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे पी पी कीट नसतानादेखील ते आपली जबाबदारी पूर्णपणे पाळत होत्या. कोरोना काळातील आशा वर्करांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यांच्याही घरी लहान मुले असतीलच, असे असतानाही कोरोना काळामध्ये आशा वर्करांनी निस्वार्थपणे आपले काम केले. पगार नसतानासुद्धा मानधन स्वरूपात जेवढे मिळेल तेवढ्या मानधनात देशसेवा केली.
आशा वर्करांच्या सुपरवायझरांचा कागदपत्रांसाठी वेगवेगळा नियम. काहींना बर्थ प्लेन चालतो तर काहींना चालत नाही, असे का? एखादी महिला घरी डिलिव्हरी झाली तर तिला दवाखान्यातच दाखवा, अशी जबरदस्ती का? असा प्रश्न आशावर्करांना पडला आहे. अशा समस्यांकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का व कधी देणार? अशी भाबडी आशा आशावर्कर करत आहेत.