जळगाव – प्रतिनिधी
येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर विद्यालयात आज दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुख्य प्राध्यापक श्री पी आर श्रावगी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रतिमा याद्निक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री डी. डी. पाटील ,ज्येष्ठ शिक्षक श्री बी. एन. पानपाटील , श्री . कलंत्री श्री, संजय पिले आदी उपस्थित होते. संगीत शिक्षक संजय क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गीत व पोवाडा सादर केला.
त्यांना साथसंगत संगीत शिक्षिका सौ प्रांजली रस्से, श्री संजय पिले यांनी दिले. शाळेतील शिक्षक श्री डी. पी. वाघ यांनी शिवरायांची प्रतिमा शाळेत भेट दिली. शिवजयंतीनिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले तसेच शिवरायांच्या आज्ञा पत्राचे वाचन देखील करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री रामचंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन व कार्याबद्दल माहिती विषद केली. शाळेतील कलाशिक्षक श्री अरुण सपकाळे यांनी फलक लेखनाद्वारे जाणता राजा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपस्थितांचे आभार श्री आर. बी. महाजन यांनी मानले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.