आय.टी.आय.जवळ अर्धवट सोडलेल्या धोकादायक झालेल्या रस्त्याविरोधात आमरण उपोषण….!!!!!

0
17
भडगाव (वार्ताहर) – येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753J वरील भडगाव-पाचोरा रस्त्यादरम्यान आय.टी.आय.भडगाव,जवळ असलेल्या टर्नवर ठेकेदाराने अर्धवट केलेल्या कामामुळे रोजच अपघात होत आहे,शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी,नोकरदार वर्ग रोजच ह्याच रस्त्याने आपला जीव मुठीत घालून प्रवास करतात,तरीही अनेकदा ह्याठिकाणी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे,ह्या विरोधात पाचोरा जागृत जनमंच तर्फे उपोषण करण्यात येत असून त्याबद्दलचे निवेदन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,खासदार उन्मेष पाटील,आमदार किशोर पाटील,जिल्हाधिकारी,जळगाव इ.ना देण्यात आले असून लवकरात लवकर कामास सुरुवात करुन होत असलेले अपघात थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   जोवर कामास सुरुवात होत नाही,तोवर उपोषण करणार असल्याचे निवेदन पाचोरा जागृती जनमंचचे निळकंठ पाटील,गुलाब पाटील,प्रवीण पाटील आदि सदस्यांनी प्रशासनास दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here