‘आधार सीडिंग’च्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक सीडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी आधार व मोबाइल क्रमांक जोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रास्त दर धान्य दुकानातील ज्या लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाइल व आधार क्रमांक सीडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदारांनी करावयाची आहे.
जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ८ या कालावधीत उघडी ठेवण्यात यावीत. या वेळेत धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाइल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल क्रमांक सीडींग कार्यवाही करून घ्यावी. जेथे आठवडी बाजार भरत असेल अशा ठिकाणी त्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवा, औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवा, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने लाभार्थी मतदानासाठी येणार आहेत. या दिवशी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाइल सीडिंग करून घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here