विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील किन्ही ता सोयगाव येथिल आदर्श जिल्हा परिषद शाळेची संपुर्ण जिल्हात चर्चा होत आहे शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण समिती तर्फे भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला विशेष कार्यक्रमात छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरूवात करण्यात आली,मुलांनी शिवसंस्कार अंगीकृत करावे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील सर यांनी केले तसेच गावातील नागरीकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून स्पर्धेकांचे बक्षीस देऊन कौतुक केले,आदर्श शाळेची सर्व क्षेत्रातुन दखल घेतली जात आहे यातच स्वप्नपुर्ती फाउंडेशन च्या वतीने शालेय मुलांना शिवचारीञ्य पुस्तके भेट देण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे यांनी दिली,यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती गीता योगेश झेंडे, उपाध्यक्ष प्रभाकर वाडेकर, बशीर शेख,अण्णा आगे,सुमित्रा तुपे,सविता तुपे ,उषाताई घुले व ग्रामस्थ तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक दिलीप कुंभार सर, रवी पाटील, विकास देशमुख, हंगरगे सर, श्रीमती दाभाडे मॅडम व हातकर मॅडम आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदसिंग परदेशी सर यांनी केले.