जामनेर– तालुक्यातील चिंचखेडा बु! येथील रहिवाशी व जामनेर शहरातील हिमालया अॅ ग्रोचे संचालक आप्पासो आत्माराम शंकर पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी आज दीं.२८ रोजी संध्या.७:१२ वाजता औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर आज दीं.२९ रोजी सकाळी १० वाजता चिंचखेडा बू! येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ते चिंचखेडा बू! येथील माजी सरपंच पांडूरंग शंकर पाटील यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पच्य्यात पत्नी, भाऊ, दोन बहिणी,तीन मुले , दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.