आता विरोधी पक्ष नेत्यांनी जळगावसह संपूर्ण राज्याची माफी मागावी

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
कोणतेही पुरावे नसताना राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने विधानसभेत जळगावातील न घडलेल्या घटनेबद्दल आरोप केले. हा त्यांचा उथळपणा असून प्रसिद्धीसाठी विरोधक किती आसूसलेले आहेत हे त्यातून समोर आले आहे. त्यांनी आता जळगावसह संपूर्ण राज्याची माफी मागावी, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी टीका केली.
शहरातील महिलांच्या शासकीय वसतिगृहात गंभीर स्वरुपाचे गैरप्रकार पोलिसांनी केले, असे आरोप प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीही शहानिशा न करताच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यावर भाषण केले. या गैरप्रकारची चित्रफित उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेत गोधळ झाला. त्यामुळे जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याचीही बदनामी झाली आहे. जबाबदार विरोधीपक्ष म्हणून पुरेशी खात्री करून मगच त्यांनी विधिमंडळात हा विषय मांडायला हवा होता. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी केला.राष्ट्रपती राजवटीची मागणी करून आणखी पोरकटपणा केला अशी पुष्टी त्यांनी जोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here