आजपासून शहरातील १६ संकुले बेमुदत बंद

0
42

जळगाव ः प्रतिनिधी
थकीत गाळेभाडे वसुलीसाठी मनपाने दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली होती. त्यामुळे व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता परंतु मनपाने कठोर भूमिका घेतल्याने शहरातील १६ अव्यावसायिक व्यापारी संकुले आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गाळेधारक संघटनांनी घेतला. त्यानुसार आजपासून शहरातील १६ संकुले बेमुदत बंद ठेवण्यात आली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केटमध्ये काल १६ मार्केटचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत तेजस देपुरा, राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, पंकज मोमाया, वसीम काझी, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रिजवान जागीरदार, प्रकाश गगडाणी, रमेश तलरेजा, सुजीत किनगे, शैलेंद्र वानखेडकर, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, अमोल वाणी, अमित गौड उपस्थित होते.
ही संकुले बंदमध्ये सहभागी
रामलाल चौबे मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी.जे. मार्केट, डॉ.आंबेडकर मार्केट, धर्मशाळा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, भास्कर मार्केट, भोईटे मार्केट, जुने शाहू मार्केट, रेल्वे स्टेशन जवळील दुकाने, शामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर दवाखान्या जवळील दुकाने, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here