आजपासून तीन दिवस बालगंधर्व महोत्सव

0
19

जळगाव : प्रतिनिधी
वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे १ ते ३ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांनाच महोत्सवास उपस्थित राहता येणार आहे. आज सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.
एकोणिसाव्या बालगंधर्व महोत्सवाची सुरूवात आजपासून होत असून उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक सुधांशू सिंग, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्राचार्य अनिल राव, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक डॉ. अजित मराठे, बँक ऑफ महाराष्ट्रचे परिमंडळ व्यवस्थापक राजेश देशमुख, वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनीचे संचालक राजेश गाडगीळ उपस्थित राहणार आहे.
पहिल्या दिवशी प्रथम सत्रात सूर नवा ध्यास नवा फेम असलेली तरुण उदयोन्मुख आणि आश्वासक अशी कलावंत शरयू दाते ही शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. द्वितीय सत्रात मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन हे वेणू वादन अर्थात बासरी वादन कार्यक्रम सादर करतील. त्यांना तबल्याची साथ ओजस अधिया तर गिटारची साथ संजोय दास देणार आहे. महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here