अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था युवा आघाडीतर्फे पूरग्रस्तांना मदत

0
15

चाळीसगाव, प्रतिनिधी । मांगवली आदिवासी वाडी (ता.माणगाव जि.रायगड) व पाटखडकी (ता.चाळीसगाव) येथे अतिवृष्टीमुळे पूरपरीस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. अशा पूरग्रस्त कुटूंबांना अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडीतर्फे किराणा किट, ब्लँकेट, चटई, साडी, ड्रेस व संसारोपयोगी साहित्य युवा आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शिंपी, सचिव गणेश निकुंभ व कार्यालयप्रमुख रुपेश पवार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

या उपक्रमाकरीता युवा आघाडीने शिंपी समाजाला आवाहन करुन महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमधून पूरग्रस्त निधी जमा केला होता. विशेषकरुन औरंगाबाद, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस निधी मिळाला. पूरग्रस्तांना मदत देण्याकरीता समाजातील मान्यवर, समाज पदाधिकारी यांच्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात योगदान मिळाले. या उपक्रमाकरीता युवा आघाडीचे उपाध्यक्ष अजय जाधव, सहसचिव संदीप सोनवणे, युवा आघाडीचे पदाधिकारी, औरंगाबाद जिल्हा युवाध्यक्ष प्रमोद कापडणे, नगर जिल्हा युवाध्यक्ष निखील पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रदीप भांडारकर, जितेंद्र खैरनार, माणगाव (जि.रायगड) येथील विजय ईसई व रविंद्रकुमार बोरसे यांनी विशेष सहकार्य केले व परीश्रम घेतले.
युवा आघाडीच्या या अभिनव उपक्रमाचे अखिल भारतीय श्रीक्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागूल व विश्‍वस्त मंडळातर्फे कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here