अमळनेर, प्रतिनिधी । शहरातील ढेकुरोडवरील एका ३४ वर्षीय विवाहितेने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहरातील ढेकूरोडवरील एका तरुण विवाहित महिलेने घरात आेढणी व दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १२ रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास आनंद कॉलनीत घडली. सोनिया घन:श्याम काटे (वय ३४) असे त्या महिलेचे नाव आहे. सोनिया यांचे पती घन:श्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात रात्र पाळीला ड्युटीला गेले असता सोनियाने घरात गळफास घेतला. ती मानसिक रुग्ण होती. धुळे येथील डॉ. गौतम शहा यांच्याकडे उपचार सुरू होते, अशी माहिती पती घन:श्याम यांनी पोलिस स्टेशनला दिली.