अमळनेरला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा

0
12

अमळनेर : प्रतिनिधी
येथील जीएम सोनार नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज यांचा आज 23 फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने मंदिराचा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पाद्यपूजन, महिलांचे सामुहिक पारायण व महाप्रसादाच्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संत गजानन महाराज मंदीर परिसरात मंडप, डेकोरेशन, रांगोळी काढून आजूबाजूचा परिसर भक्तीमय झाला. सकाळी सात ते नऊ पाद्यपूजन मंदिराचे पुजारी नितीन भावे, जितेंद्र कोठावदे, ज्योती पवार, कल्याणी भावे, अशोक भावे, ह.भ.प.रघूनाथ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सकाळी 8 वाजता  ज्योती पवारसह सर्व गजानन महाराज महिला भक्तांनी सामूहिक पारायण केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचा आनंद गजानन भक्तांनी घेतला. प्रकट दिनानिमित्त अमळनेर शहरातील कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले अविनाश सोनार यांच्या माध्यमातून जी.एम. सोनार नगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसाद व मंदिराच प्रवेश द्वाराचे उद्घाटन उद्योगपती अविनाशजी सोनार, निता सोनार, गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी. पवार, विश्‍वस्त ज्योती पवार, यश सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मदत करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रवीण पवार, जयवंतराव पाटील,  एस.एच.पाटील, चेतन उपासनी, एल.जे.चौधरी, प्रा.पी.टी धर्माधिकारी, माजी न्यायाधिश गुलाबराव पाटील, मोहीत पवार,  परेश पाटील, अनिल पाटील, मोहित पवार, आनंद पाटील, एस.के. बागूल, लहूकांत पाटील, वसंतराव जाधव, शंतनू पवार, मातोश्री मंडपचे मालक विनोद पाटील, जे.पी.महाजन, पद्माकर पाटील, डी.आर.जगताप, गजानन महिला भक्त ज्योतीताई पवार, सरला चव्हाण, शोभा कोळी, सुनिता खोंडे, वंदना पाटील, संगीता पाटील, बबिता पवार, ज्योती माळी, हिराबाई पाटील, मंगला सोनार, भावसारताई, मंगलाताई मिस्तरी, रेखा पवार, प्रिया उपासनी, निशा पाटीलसह अनेक गजानन भक्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. अमळनेर तालुक्यातील अनेक गजानन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.जे.चौधरी यांनी केले.कार्यक्रमाला मार्गदर्शन आर.बी.पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here