Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अभिनेता-दिग्दर्शक प्रा.योगेश सोमण, दिग्दर्शक प्रकाशादित्य लामा यांची विशेष उपस्थिती
    जळगाव

    अभिनेता-दिग्दर्शक प्रा.योगेश सोमण, दिग्दर्शक प्रकाशादित्य लामा यांची विशेष उपस्थिती

    saimat teamBy saimat teamJanuary 15, 2022Updated:January 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी I येथील डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज दुपारी 4 वाजता अभिनेता- दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान, महाविद्यालय परिसरातील विविध दालनांचे उद्घाटन सकाळी करण्यात आले.

    जळगावात प्रथमच मोठ्या प्रमाणात फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलसाठी खान्देश व मराठवाड्यातून लघुपट, डाक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, ॲनिमेशन फिल्म या चार प्रकारांत चित्रपट मागवले होते.त्यात महाराष्ट्रातून आलेल्या निवडक 50 लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण होत आहे.

    महाविद्यालयाच्या प्रांगणास स्व.स्मिता पाटील चित्रपट नगरी, मुख्य दालनास दादासाहेब फाळके दालन, स्व. निळू फुले दालन अशी नावे देण्यात आली आहे. या दोनदिवसीय फिल्म फेस्टिव्हलसाठी अभिनेता दिग्दर्शक, लेखक प्रा. योगेश सोमण, दिग्दर्शक प्रकाशादित्य लामा यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.

    महोत्सवाची सुरुवात महाविद्यालयातून 15 जानेवारीला सकाळी 10 वाजता विविध दालनांतून झाली तर उद्घाटन सोमण यांच्या हस्ते व लामा यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता झाले. हा महोत्सव लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.महोत्सव यशस्वीतेसाठी गौरी राणे यांच्यासह सचिव अनिल भोळे, विनीत जोशी, जयंत लेकुरवाळे व इतर प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026

    Jalgaon : महाशिवरात्री निमित्त जळगावात ब्रह्माकुमारीजचा भव्य उपक्रम

    February 14, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.