जळगाव हेमंत काळूंखे
जळगाव केंद्रावरील राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भुसावळच्या ब्राह्मण संघाने सादर केलेल्या ‘एक विस्कटलेला चौकोन` या नाटकाने रसिकांवर प्रभाव पाडण्यात व प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यश प्राप्त केले व नाट्यस्पर्धेत चुरस निर्माण केली.त्याबद्दल सर्वप्रथम भुसावळ ब्राह्मण संघाच्या सर्व टीमचे अभिनंदन. नाट्यसंहितेपासून काही किरकोळ दोष सोडले तर दिग्दर्शन,अभिनय,संवादफेक,नेपथ्
राजकारणावर आधारित नाट्यसंहिता सध्याच्या गलिच्छ राजकारणावर प्रकाशझोत असणारी व भविष्यात राजकारणात स्वच्छ ,निर्मळ चारित्र्याची तरुण सुशिक्षित पिढी येण्यासाठी धडपडणाऱ्या दादासाहेब हिंमतराव देशमुख व त्यास तीव्र विरोध करणाऱ्या अमित सहस्त्रबुध्दे आई-वडिलांच्या संघषाची आहे.आजचे राजकारण इतके गलिच्छ व गढूळ झाले आहे की,कोणत्याही आई-बापाला आपल्या मुलाने या क्षेत्रात करिअर करावे असे वाटणार नाही.शिवाजी राजे जन्माला यावे पण माझ्या घरात नाही तर शेजारच्या घरात,असे प्रत्येकाला वाटत असल्याने अखेर देशाला उत्तम नेतृत्व देणारा नेता व राजकारणी कसे तयार होतील,या प्रश्नाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद.
भालचंद्र उखळकर लिखित व पंकज जोशी दिग्दर्शीत `एक चौकोन विस्कटलेला` या नाटकातील दादासाहेब हिंमतराव देशमुख या स्वच्छ व चांगल्या राजकारणासाठी धडपडणाऱ्या नेत्याची भुमिका दिग्दर्शक पंकज जोशी यांनी स्वतः मोठ्या खुमासदार पणे वठविली आहे. त्याचा काहीसा परिणाम दिग्दर्शनाच्या बाजूवर पडल्याचे जाणवले. तरीही एकंदरीत रसिकांवर प्रभाव पाडण्यात नाटक यशस्वी झाले . या नाटकात भाव खावुन गेला तो चिन्मय केळकर(अमित सहस्त्रबुध्दे) अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणार हरउण्णरी तसेच समाज कार्याची विलक्शन आवड असणारा मात्र तितकाच संवेदनशिल तरूण त्याने तितकच्याच दमदारपणे सादर केला. त्यास प्रेक्षकांनीही वेळोवेळी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याच्या आई वडीलांच्या भुमिकेत उच्च पदस्त श्रीमान सहस्त्रबुध्दे (मदन चिव्हाणे) व आई प्रा.श्रीमती सहस्त्रबुध्दे(रूपा अग्रवाल) या आनंदी जीवन जगणाऱ्या व राजकारणाबद्दल मनात तिव्र संताप असलेल्या कुटूंबाची त्यांनी तेवढ्याच तोलामोलाची भुमिका साकारली आहे. त्यांना अनुया(साक्षी भटकर),मुक्त पत्रकार अनुपमा(सुनिता चौधरी), बंडू भाऊ(रोहित अडकमोल), मिसेस पाटील(पल्लवी जोशी), यांच्या सह सनी बाविस्कर(नरेश),मोहनिश निकम(प्रताप),नचिकेत जोशी(संग्रमा), सुकृत जोशी(बबलू), यांनीही चांगली साथ दिली आहे.
मुकेश खपली यांची संगीत योजना व शंभु गोडबोले यांचे संगीत संयोजन कथेला साजेशे असले तरी ते अधिक प्रभावी करता आले असते. सुनिल पाटील यांची प्रकाश योजना व रमाकांत भालेराव यांची रंगभुषा नाटकाला साजेशी. खुशी अग्रवाल व मुकूंद महाजन यांनी वेषभुषेची जबाबदारी उत्तम सांभाळली आहे. ओजस जोशी व वैभव कुळकर्णी यांची रंगमंच व्यवस्था काही किरकोळ दोष सोडल्यास साजेशी झाली आहे. नव्या पिढीने राजकारणात यावे ही काळाची हाक ओळखण्यास लावणारे हे नाटक प्रत्येकाला अंतर्मुख करणारे ठरले.
* आजचे नाटक *
‘माणुस नावाचे बेट`
केअरटेकर फाऊंडेशन, जळगाव
नाट्य स्पर्धेला रसिकांचा प्रतिसाद
राज्य नाट्य स्पर्धेला सुरूवात झाली त्या पहिल्या दिवशी नियोजनात काहीसा गोंधळ उडाला असला तरी दुसऱ्या दिवशी त्यात सुधारणा करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवले. नाटक सायंकाळी 7 वाजता सुरू करण्याची समन्वयक दिलीक पाटील व त्यांच्या टिमची धडपड वाखणण्या जोगी. या नाट्य स्पर्धेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असुन कालच्या नाटकाला भुसावळहून देखिल बरेच रसिक आले होते.त्यात रसिक रत्नाकर व आनंद यांनी भुसावळहून खास रिक्षाकरून हजेरी दिली. हे देखिल कौतूकास्पद. या पुढील नाटकांनाही रसिकांनी असाच प्रतिसाद देवून स्प्ार्धा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन समन्वयक दिपक पाटील यांनी केले आहे. दरम्यान रसिकांसाठी मध्यंतरला नाट्यगृह परिसरात पिण्याच्या पाण्याची व नाश्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रेक्षक करीत आहेत.