जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव आयोजित छात्र गर्जना विद्यार्थी संमेलन कार्यक्रमात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची कार्यकारणी घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप जळगाव जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्रमुख अतिथी बालकवी शाळेचे शिक्षक महेश आहेरराव सर, कार्यक्रमासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविपचे जळगाव जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर शहरमंत्री आर्यन सैंदाणे उपस्थित होते.
अभाविप जिल्हा प्रमुख यांनी अभाविप मांडणी करत कार्यकर्त्यांना परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो, म्हणून आपण सर्वांना मिळालेली जबाबदारीला योग्य न्याय द्यावा व राष्ट्र कार्यात सामील व्हावे असेही त्यांनी सांगितले. महेश आहेरराव यांनी कार्यकर्ता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष म्हणून प्रेम ठाकरे, उपाध्यक्ष चंद्र सिकरवार, काजल बिचवे, टिना नायर, सचिव विवेक बयस, सहसचिव कुणाल कासार, महती बागूल तर वरिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष हरीष महाजन, उपाध्यक्ष अनुश्री भावे, रोशनी चौधरी, अनंता धारणे, सचिव अभय सुर्यवंशी, सहसचिव ईशा सोनिचा, प्रेम गुजर यांची निवड करण्यात आली. याशिवाय ५६ कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सुपूर्द करण्यात आल्या. तसेच २३ विस्तार केंद्रांची घोषणा देखील यात करण्यात आली. यामध्ये ४९ विद्यार्थ्यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन प्रथमेश भावसार यांनी केले, तर आभार शहरमंत्री आर्यन सैंदाणे यांनी मानले.