जळगाव ः प्रतिनिधी
छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर शाखेतर्फे रविवारी नक्षलवादी विरोधी फलक घेऊन निषेध करण्यात आला. या हल्ल्यात २२ भारतीय जवान शहीद झाले. जखमी जवानांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी महानगर मंत्री आदेश पाटील यांनी राष्ट्रद्रोही विचारसरणीचा निषेध करत नक्षलवाद ना मावोवाद, सबसे उपर राष्ट्रवाद अशा घोषणा दिल्या. हर्षल तांबट, चिराग तायडे, मयूर माळी, मनीष चव्हाण, रितेश महाजन, आकाश पाटील, अंकित चव्हाण, दुर्गेश वर्मा यावेळी उपस्थित होते.
छत्तीसगड राज्यात बिजापूर येथे नक्षली हल्ल्यात २३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना अभिवादन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.