अनाथ व एकल पालक यांना शालेय साहित्य ड्रेस कपडे चप्पल वाटप

0
78

जळगाव, प्रतिनिधी । अनाथाच्या हातून घडले समाजकार्य अमोल पाटील यांनी त्यांच्या अन त्यांच्या भावनातून निघालेल्या समाजकार्य या महान कार्यात त्यांच्या मित्रांनी मिळून अनाथ व विधवा विकास बहुउद्देशीय संस्था स्थापन करून समाजातील अनाथ व विधवा विकास बेघर गोरगरीब सेवा करण्याची त्यांची व त्यांच्या मित्रांची इच्छा आहे त्यांनी आतापर्यंत शालेय साहित्य 15 ऑगस्ट रोजी वाटप केले.

मुलांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, म्हणून व आता त्यांचे सहकारी मित्र हरीश मांडोळे यांनी त्यांच्या मित्रा च्या काकूचे वर्ष श्राध्द चे कार्यक्रम त्यामधून दहा अनाथ मुलांना व मुलींना शालेय साहित्य व स्कूल बॅग ड्रेस कपडे चप्पल जेवण व विधवा महिलांना साडी वाटप केली हे वाटपाचे कार्यक्रम महेश देवरे यांनी केले.

यावेळी अनाथ व विधवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल विरभान पाटील व उपाध्यक्ष रुपेश वानखेडे सचिव राहुल चव्हाण यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य व साडी वाटप केले. यावेळी गौतम मोरे, नचिकेत आहिरे, भूषण पिंगळे, घनश्याम जगताप, किरण पाटील, शुभम गवळी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महेश देवरे यांनी या संस्थेमार्फत अजून समाज कार्य घडो ही इच्छा व्यक्त केली व स्वच्छेने देवरे परिवार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here