यावल, प्रतिनिधी । दि.21 ऑक्टोबर2021रोजी जामनेर तालुक्यातील लोणी गावात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांना लेखी निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे देण्यात आले.
दि.21ऑक्टोबर2021रोजी लोणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी शासकीय कामकाज करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व अंमलदार,पोलीस कर्मचारी यांना काही समाजकंटकांकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली त्या निषेधार्थ दि.25सोमवार रोजी जिल्हाधिकारी साहेब जळगाव,व पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सदर आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होऊन कारवाई करण्यात यावी जेणेकरून खाकी वर्दी वर हात टाकण्याची कोणाची हिंमत होऊ नये म्हणून तिव्र निषेध व्यक्त केला.निवेदन देताना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन चे जिल्हा अध्यक्ष भूषण नागरे, जिल्हा संघटक घनश्याम निळे, जिल्हा कायदेविषयक मार्गदर्शक कोमल पाटील,धानोरा अध्यक्ष विनोद तावडे इत्यादी उपस्थित होते.
