जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील फुपनगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन शाखेची इंजिनीयर असलेल्या कु.प्रियंका भास्कर सोनवणे या तरूणीने बिनविरोध विजयी होत गावाची …कारभारी’ होण्याचा सन्मान प्राप्त केला तर उपसरपंचपदी महेश कैलास अत्रे यांचीही बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फुपनगरी मध्ये जितेंद्र अत्रे यांच्या परिवर्तन विकास पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित विद्यमान सरपंच शामकांत जाधव यांच्या पॅनलचा पराभव करून बहुमत प्राप्त केले होते. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल वानखेडे यांनी काम पाहिले.त्यांना तलाठी ज्ञानेश्वर माळी, ग्रामसेविका अनिता सपकाळे व सेवक प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.
निवडीप्रसंगी पॅनल प्रमुख जितेंद्र अत्रे, त्यांच्या मातोश्री सुमती अत्रे, नवनिर्वाचित सदस्य युवराज पवार, अविनाश नेरकर, गुंफाबाई भालेराव, भारती सोनवणे यांच्यासह गावातील मान्यवर व अनेकांची उपस्थिती होती.
