Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

    saimat teamBy saimat teamFebruary 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    शहरातील वाटीका आश्रमाजवळील राष्ट्रीय महामार्गावर एका ५० वर्षीय पादचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अज्ञात वाहनधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिसरातील भरत रामचंद्र सोनवणे (वय ५०) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काल रात्री वाटीका आश्रम परिसरात राहणारे त्यांचे मित्र मगन काळे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रम आटोपून भरत सोनवणे हे कांचननगरकडे जाण्यासाठी १० वाजेच्या सुमारास पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, दोन मुले ललित व घनश्याम व एक विवाहीत मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास पोहेकॉ गुलाब पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.