Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, एक जखमी
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, एक जखमी

    saimat teamBy saimat teamFebruary 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    ट्रकचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद जवळील पाटील नर्सरीजवळ घडली. याप्रकरणी शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भास्कर झाल्टे (वय-२४) रा. पातोंडा ता. नांदूरा जि. बुलढाणा असे मयताचे नाव आहे. किशोर झाल्टे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी काम करून उदरनिर्वाह करत होते. २२ जानेवारी रोजी किशोर झाल्टे आणि त्याचा मित्र दिपक मधूकर सुरळकर रा. कोथळी ता. मोंढाळा जि. बुलढाणा हे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच २८ बीजे ९३०) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव येथे येत होते.

    रात्री ११ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरीकडून जळगावकडे येत असतांना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वात किशोर झाल्टे हा जागीच ठार झाला तर दिपक सुरळकर हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मयत किशोर झाल्टे यांचे वडील भास्कार श्रीराम झाल्टे यांच्या फिर्यादीवरून शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजेंद्र ठाकरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.